मिनी मंत्रालय कोकण भवन जवळ नशेचा व्यापार!

  • Admin
  • महाराष्ट्र
  • Oct 23, 2025

भारत समाचार टीव्हीच्या स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक उघड

नवी मुंबई | प्रतिनिधी

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या ( Navi Mumbai police ) हद्दीत असलेल्या बेलापूर( Belapur )  परिसरातील कोंकण भवन (kokan Bhawan ), ज्याला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते, त्याच्या अगदी शेजारी टाटा नगर स्लॅम मध्ये नशेचा( Dragus) व्यापार सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. हा संपूर्ण प्रकार भारत समाचार टीव्हीच्या (Bharat samachar tv ) स्टिंग ( sting ) ऑपरेशनमधून समोर आला आहे.

या स्टिंगमध्ये उघड झाले आहे की कोंकण भवनच्या मागील टाटा नगर झोपडपट्टीत गांजा, एमडी आणि स्मॅकसारखे घातक अमली पदार्थ खुलेआम विकले जात आहेत. भारत समाचारच्या अंडरकव्हर टीमने जेव्हा केवळ ₹500 मध्ये नशा मागितला, तेव्हा एका महिलेनं त्यांना आत बोलावून पुरवठा केला आणि नशा सेवन करण्याची जागाही दाखवली. इतकेच नव्हे तर येथे होम डिलिव्हरीची सुविधाही दिली जात असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, कळंबोली स्टील मार्केट परिसरात दिवाळीच्या दिवशी अँटी नारकोटिक सेलने कारवाई करत सुमारे ₹15 लाखांचा अमली पदार्थ जप्त केला आणि काही संशयितांना अटक केली होती. परंतु, बेलापूरमध्ये मंत्रालयाच्या जवळच इतक्या मोठ्या प्रमाणावर नशेचा व्यापार सुरू असणे, पोलिस आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, बेलापूरव्यतिरिक्त सानपाडा, एपीएमसीमधील एकता नगर झोपडपट्टी, तुर्भे MIDC आणि तुर्भे स्टोअर या भागातही नशेचे जाळे पसरले आहे. काही बांगलादेशी नागरिक या अवैध धंद्यात सामील असल्याचीही माहिती पुढे आली आहे.

नागरिकांनी सांगितले की, ते भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार करत नाहीत, कारण काही वेळा पोलिसांचेच खबरी नशा विक्रेत्यांना तक्रारीची माहिती देतात. त्यामुळे तक्रारदारांवर हल्ला होण्याची किंवा धमकी मिळण्याची भीती कायम असते.

आता प्रश्न असा आहे की, जेव्हा नवी मुंबई पोलिस आयुक्तालय आणि मिनी मंत्रालय (कोंकण भवन) काही पावलांवरच आहे, तेव्हा इतकी मोठी अवैध हालचाल प्रशासनाच्या नजरेतून कशी सुटली? या उघडकीनंतर ठोस कारवाई होणार का, की हा प्रकारही नेहमीप्रमाणे थंड बस्त्यात जाणार — हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.