होळी–धूलिवंदन काळात ठाण्यात वाहतूक पोलिसांची धडक...
- Mar 04, 2026
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक; १७ जणांना अटक
नवी मुंबई | मिलेनियम बिझनेस पार्क परिसरात शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अवैध कॉल सेंटरचा नवी मुंबई सायबर सेलने(Navi Mumbai cyber cell) पर्दाफाश केला आहे. मंगळवारी दुपारी या कॉल सेंटरवर छापेमारी करण्यात आली असून प्रमुख आरोपीसह एकूण १७ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये बहुसंख्य तरुणांचा समावेश असल्याची माहिती मिळते.
ही कारवाई मंगळवार दुपारपासून बुधवारी सकाळपर्यंत सुरू होती. दरम्यान पोलिसांनी कॉल सेंटरमधील संगणक, मोबाईल फोन, कागदपत्रे तसेच संबंधित डाटा जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीनुसार, आरोपी शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेल असे सांगून लोकांना फसवत होते.
सर्व आरोपींना बुधवार दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बातमी लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती. या प्रकरणाबाबत नवी मुंबई पोलिस लवकरच प्रेस कॉन्फरन्सद्वारे अधिक माहिती जाहीर करणार आहेत.
सायबर सेलने केलेली ही कारवाई गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीच्या रॅकेटविरोधातील एक मोठी कामगिरी मानली जाते.