होळी–धूलिवंदन काळात ठाण्यात वाहतूक पोलिसांची धडक...
- Mar 04, 2026
नवी मुंबई।नवी मुंबई महानगरपालिकेच्या (Navi Mumbai municipal corporation) महापौरपदासाठी Mayor) भाजपकडून माधुरी सुतार (Madhuri Sutar ) यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवी मुंबई भाजपने याबाबतचा प्रस्ताव प्रदेश कार्यालयाकडे पाठवला असल्याचे समजते.
माधुरी सुतार या शिरवणे गावातून निवडून आलेल्या नगरसेविका असून, त्या भाजपच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा म्हणूनही कार्यरत होत्या. संघटनात्मक अनुभव, महिला नेतृत्व आणि स्थानिक पातळीवरील पकड यामुळे त्यांच्या नावाला महत्त्व दिले जात असल्याची चर्चा आहे.
माधुरी सुतार यांच्या नावाच्या प्रस्तावामुळे महापौरपदाच्या निवडणुकीबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, भाजप प्रदेश कार्यालयाकडून अखेर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.